उपाध्यक्षपदी सोमनाथ राऊत यांची निवड
निलेश मोरे
भिगवण : येथील श्री संत सेना महाराज नाभिक संघटनेच्या शहराध्यक्षपदी प्रकाश दळवी, तर उपाध्यक्षपदी सोमनाथ राऊत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
भिगवण शहर नाभिक संघटनेच्या वतीने मंगळवारी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित समाजबांधवांच्या संमतीने संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत शहराध्यक्षपदी प्रकाश दळवी, उपाध्यक्षपदी सोमनाथ राऊत, खजिनदारपदी अमोल मोरे, कार्याध्यक्षपदी हरिश्चंद्र लोखंडे, सचिवपदी रमेश गायकवाड, तर सहसचिवपदी सागर राऊत यांची निवड करण्यात आली.
यावेळी भिगवण शहरातील राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाची संघटनात्मक एकजूट अधिक मजबूत करण्यासोबतच समाजाच्या विविध प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय गायकवाड यांनी केले, तर राजेंद्र दळवी यांनी आभार मानले. उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सवाची सांगता झाली.







