(संतोष पवार)
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र तुळजापूर येथून आणलेल्या श्री यमाई तुकाई देवीच्या ज्योतीचे पळसदेव ता. इंदापूर येथील ग्रामस्थांकडून मोठ्या भक्तीभावाने स्वागत करण्यात आले. पळसदेव येथील श्री यमाई तुकाई मंदिरात दरवर्षी नवरात्र उत्सव अत्यंत भक्तीपरंपरेने साजरा करण्यात येतो.
सालाबादप्रमाणे येथील युवकवर्गाने महाराष्ट्राचे शक्तिपीठ असलेल्या श्रीक्षेत्र तुळजापूर येथून आणलेल्या देवीच्या ज्योतीचे पळसदेव गावच्या वेशीत प्रवेशद्वाराजवळ भक्तीभावाने पूजाअर्चा करत स्वागत करण्यात आले.
यावेळी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे , देविदास बांडे, शरद काळे , विलास काळे , देविदास बांडे , लक्ष्मण काळे यासंह पळसदेव ग्रामस्थ ,युवकवर्ग महिला भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भक्तीमय वातावरणात वाजतगाजत आणलेल्या ज्योतीची यमाई तुकाई मंदिरात विधीवत पूजा करून घटस्थापना केली गेली. दरम्यान संपूर्ण नवरात्र उत्सवाच्या काळात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून मोठ्या श्रद्धेने व भक्तीपरंपरेने भाविक दर्शनासाठी मंदिरात येत असतात.त्यामुळे पळसदेव आणि संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते.







