(निलेश मोरे)
शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील रयत शिक्षण संस्थेचे, श्री मयुरेश्वर विद्यालय मोरगाव येथील कलाशिक्षक तसेच श्री नागेश्वर विद्यालय शेटफळगढेचे ते माजी विद्यार्थी श्री ज्ञानेश्वर राऊत यांची ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य’ या संस्थेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सदरची निवड २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी जाहीर झाली आहे.
ज्ञानेश्वर राऊत हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रात सक्रिय आहेत.मयुरेश्वर विद्यालयात कलाशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना कलेचे धडे देत असतानाच त्यांनी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे उपक्रम राबवले आहेत.
केवळ झाडे लावणे नव्हे, तर ती जगवणे आणि निसर्गपूरक जीवनशैलीचा प्रसार करणे यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे.
त्यांच्या याच भरीव योगदानाची जिल्हा पातळीवर दखल घेत निवड केली आहे.
ज्ञानेश्वर राऊत यांच्या या निवडीमुळे शेटफळगढे व मोरगाव परिसरासह शैक्षणिक व सामाजिक वर्तुळातून समाधान व्यक्त होत आहे.तसेच निसर्गप्रेमी नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून देखिल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


