(संतोष पवार)
पळसदेव ता. इंदापूर येथील पळसनाथ विद्यालयाच्या खेळाडूंनी विविध शालेय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे . कुस्ती ज्युदो हँडबॉल आदि क्रीडाप्रकारात दमदार यश मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे .
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ पुणे यांच्या संयुक्त वतीने पारगाव (सा.मा).ता. दौंड येथे संपन्न झालेल्या पुणे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विद्यालयाचे मल्ल यशराज सचिन जाधव याने खुल्या गटातून ९२ किलो वजनगटातून आणि गणेश लवटे याने ६५ किलो वजनगटातून तर सौरभ वीरकर या मल्लाने चमकदार कामगिरी बजावत जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला त्यांची विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
एम. आय.टी.लोणी काळभोर ता. हवेली येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सृष्टी सावता बनसुडे ही खेळाडू प्रथम क्रमांक मिळवत विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी पात्र ठरली तर प्रणव शिंदे, वेदांत बनसुडे, यांनी बॉक्सिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. दरम्यान इंदापूर येथे झालेल्या शालेय जिल्हा सांघिक हॅडबॉल स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातून मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला .
विद्यालयाच्या या उल्लेखनीय क्रीडा यशाबद्दल सर्व यशस्वी खेळाडू आणि मार्गदर्शक क्रीडाशिक्षक सिकंदर देशमुख, नितीन जगदाळे, सुवर्णा नायकवाडी, रामचंद्र वाघमोडे, यांचे पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे सचिव योगिराज काळे संस्थेचे सर्व पदाधिकारी विद्यालयाचे प्राचार्य पर्यवेक्षक यांनी अभिनंदन केले आहे.







