(संतोष पवार)
भारतीय स्वातंत्र्य संग्रमातील थोर सेनानी,समाज सुधारक विचारवंत शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि ,राष्ट्रभक्ती त्याग व समर्पणाचे मुर्तिमंत उदाहरण असणारे भारताचे दुसरे माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्रीजी यांची जयंती पळसदेव (इंदापूर) येथील पळसनाथ विद्यालयात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील शिक्षक नितीन दशवंत होते. सत्य अहिंसा सत्याग्रह सविनय कायदेभंग स्वदेशी असहकार यांचा वापर करून जुलमी ब्रिटीश राजवटीविरुद्ध भारतीय जनमत तयार करणारे राष्ट्रभक्त महात्मा गांधीजी आणि जय जवान जय किसान नारा देत शेतकरी व सैनिकांविषयीं प्रचंड आस्था बाळगणारे, देशातील श्वेत व हरितक्रांतीचे जनक, राष्ट्रउभारणीच्या कार्यात मोठा वाटा असणारे देशाचे माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांचे विचार आचरणात आणून विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य घडविण्याची गरज असल्याचे मत दशवंत यांनी व्यक्त केले.
दरम्यान स्वच्छता पंधरावडा अंतर्गत स्वच्छता अभियानासारखे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय जाधव यांनी दिली . दरम्यान महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक , शिक्षक शिक्षकेत्तर आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते.







