१४ वर्षांखालील ६२ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला
निलेश मोरे
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंदापूर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा सन २०२६-२७ लोणी देवकर येथील आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती केंद्रात पार पडल्या.
या स्पर्धेत भैरवनाथ विद्यालय, तक्रारवाडी येथील विद्यार्थी आलोक अनिल काळंगे याने १४ वर्षांखालील ६२ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले.
आलोकने जय मल्हार तालीम, भिगवण येथे घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. त्याला प्रशिक्षक दत्ता गायकवाड, अजय कोथमीरे, नागेश गायकवाड आणि बनकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
आलोकच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भैरवनाथ विद्यालयातील शिक्षक, पालक, कुस्तीप्रेमी आणि भिगवण व तक्रारवाडी परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आलोकच्या या यशामुळे तक्रारवाडीच्या कुस्ती क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.







