(निलेश मोरे)
श्री भैरवनाथ महाराजांच्या पावन नगरीत सद्गुरू संत श्री बाळूमामा महाराज यांच्या मेंढी माऊलीच्या पालखीचा, बग्गा क्रमांक १४ चा महोत्सव सोमवार, दि. १९ ऑक्टोबरपासून जुना पुणे-सोलापूर रोड, भिगवण येथे सुरू होत आहे. पालखीचे सकाळी १० वाजता अहिल्यादेवी चौक, मदनवाडी रोड येथे आगमन होणार असून, त्यानंतर पालखीची गावातून महोत्सवस्थळी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
महोत्सवानिमित्त १९ ते २३ ऑक्टोबरदरम्यान ह.भ.प. वैशालीताई महाराज धायगुडे, प्रतिभाताई महाराज वाघमारे, संतोष महाराज गाडेकर, वैभवकाका महाराज जोशी आणि दादा महाराज ढवळे यांच्या कीर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत कीर्तन, रात्री ९ वाजता आरती आणि रात्री ९.३० नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी सद्गुरू संत बाळूमामा जन्मोत्सवानिमित्त दुपारी २ ते ४.२३ या वेळेत प्रवचन व कीर्तनरूपी सेवा होणार आहे. दुपारी ४.२३ वाजता जन्मोत्सवानिमित्त पुष्पवृष्टी करण्यात येणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सद्गुरू संत बाळूमामा पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे भिगवण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.
या महोत्सवात पालखी स्वागत, कीर्तनसेवा, जन्मोत्सव आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भिगवण व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारभारी हलाप्पा सिद्धप्पा सुरणवर तसेच समस्त ग्रामस्थ भिगवण व पंचक्रोशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.







