जिल्हा अध्यक्षपदी,बबनराव धायतोंडे तर तालुका अध्यक्षपदी निलेश गायकवाड
इंदापूर तालुक्यातील पत्रकारांच्या संघटनात्मक कार्याला बळकटी देण्यासाठी पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इंदापूर तालुका कार्यकारिणीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून बबनराव धायतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये तालुका अध्यक्षपदी निलेश गायकवाड,तर उपाध्यक्षपदी संजय वायसे,सचिवपदी अभिजीत देशपांडे,खजिनदारपदी संजय शिंदे,प्रसिद्धी प्रमुखपदी महेश कळसाईत यांची निवड करण्यात आली.
तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून दत्तात्रय पारेकर,भिमसेन उबाळे,संतोष तावरे,संतोष कदम,सागर जगदाळे,अरुण भोई,प्रविण पिसे,अंकुश भोसले,महेश गडदे,सीताराम मदने आणि प्रवीण वाघमोडे यांची निवड करण्यात आली आहे.नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून तालुक्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांना व अडचणींना वाचा फोडण्याबरोबरच पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारिता क्षेत्राच्या विकासासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार करण्यात आला. पत्रकार सेवा संघाच्या इंदापूर तालुका कार्यकारिणीतील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आणि सदस्यांचे यावेळी अभिनंदन आले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पत्रकार सेवा संघांचे इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजयकुमार लोंढे, बहुजन आवाज न्युज चॅनल संपादक
विशाल पाटील,सोलापूर शहर अध्यक्ष राजेंद्र माने,गौतम थापटे,आणि इंदापूर तालुक्यातील पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी निवडीवेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







